CID फेम दिनेश फडणीस यांचं निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सीआयडी फेम दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दिनेश फडणीस लीव्हर, किडनी आणि हृदयासंबंधी अनेक समस्यांचा सामना करत होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालल्याची माहिती सीआयडी फेम दया अर्थात दयानंद शेट्टी यांनी दिली होती. सोमवारी ४ डिसेंबर रोजी १२ वाजता त्यांचं निधन झालं आहे. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे.

दिनेश यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांनी ४ डिसेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ५ डिसेंबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सीआयडी या शोची संपूर्ण टीम त्यांच्या घरी उपस्थित असल्याची माहिती आहे.

दिनेश फडणीस यांच्या मागे त्यांची पत्नी नैना आणि मुलगी तनु असं कुटुंब आहे. दिनेश फडणीस यांना सीआयडी शोमध्ये फ्रेडरिक्स भूमिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत होती. टेलिव्हिजनवरील नंबर वन शो असलेल्या सीडीआयमधून ते घराघरात पोहोचले होते. त्यांनी १९९८ ते २०१८ पर्यंत या शोमध्ये काम केलं होतं.

सीआयशी शोव्यतिरिक्त दिनेश यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांनी काही सिनेमातही कॅमियो केला होता. फ्रेडरिक्स यांच्या जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरुन कलाकार, चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *