पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणात पत्नीने चिकन बनवून न दिल्यामुळं पतीने याची शिक्षा चिमुकल्या मुलीला दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने मुलीच्या आईला एकच धक्का बसला आहे. मुलीची अवस्था पाहून तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरातील पूनम बेकरीजवळ घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणात चिकन न दिल्यामुळं चिडलेल्या वडिलांनी लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. वडिलांनी केलेल्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार पंचवटी, पाषाण) यांन चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पत्नीने चिकन न दिल्याच्या रागातून विकासने तिथेच खेळत असलेल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली आणि तिला जखमी केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाहीये.
