सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पालघर तालुक्यातील कुडण येथे ही घटना घडली असून या हल्ल्यात सात वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रेम जितेंद्र पाटील असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सात वर्षाचा प्रेम जितेंद्र पाटील हा पालघर तालुक्यातील कुडण गाVवात आपल्या कुटुंबियासोबत राहतो.मंगळवारी पहाटे सात वाजताच्या सुमारास त्याच्या घर परिसरात आसपास दाट धुके पसरले होते. यावेळी प्रेम हा खाऊ आणण्यासाठी जवळच्याच किराणा दुकानात जात असताना त्याच्यावर अचानक एका प्राण्याने हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर प्रेमने जोर जोरात आरडाओरड केल्यानंतर जवळपास असलेले नागरिक घटनास्थळी धावत आले. मात्र तोपर्यंत हा प्राणी घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात सात वर्षाचा प्रेम गंभीर जखमी झाला, त्याचा डोक्याला आणि चेहर्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.उपचारासाठी गंभीर जखमी झालेल्या प्रेम याला सिलावासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सात वर्षाचा प्रेम जितेंद्र पाटील हा पालघर तालुक्यातील कुडण गावात आपल्या कुटुंबियासोबत राहतो.मंगळवारी पहाटे सात वाजताच्या सुमारास त्याच्या घर परिसरात आसपास दाट धुके पसरले होते. यावेळी प्रेम हा खाऊ आणण्यासाठी जवळच्याच किराणा दुकानात जात असताना त्याच्यावर अचानक एका प्राण्याने हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर प्रेमने जोर जोरात आरडाओरड केल्यानंतर जवळपास असलेले नागरिक घटनास्थळी धावत आले. मात्र तोपर्यंत हा प्राणी घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात सात वर्षाचा प्रेम गंभीर जखमी झाला, त्याचा डोक्याला आणि चेहर्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.उपचारासाठी गंभीर जखमी झालेल्या प्रेम याला सिलावासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
