एका अतूट नात्याचा सोहळा, पुण्यातील समलिंगी जोडप्याचे २० वर्षांचे नाते साजरे

अनेक पुरोगामी गोष्टींची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरात केशवबाग फार्म्सच्या हिरवळीवर शनिवारी वेगळाच हृद्य सोहळा रंगला होता. समीर समुद्र आणि अमित गोखले या समलिंगी जोडप्याचा हा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम होता. पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे समीरने  सांगितले.

समीर आणि अमित दोघेही अमेरिकेत कार्यरत आहेत. पेनसिल्वानिया राज्यात पिट्सबर्ग शहरात तिथल्या कायद्यानुसार दोघेही एकमेकांशी विवाहबद्ध झाले आहेत, मात्र त्यावेळी दोघांचे पालक आणि नातेवाईक उपस्थित राहू शकले नव्हते. सगळ्यांना एकत्र बोलवण्याचा हेतू होताच, पण त्याहून अधिक महत्त्वाचे काही या सोहळ्यामागे होते.

परवानगी देता येणार नाही, कारण तसा कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, न्यायालयाला नाही असे घटनापीठाने म्हटले होते. याप्रकरणी जे अनेक याचिकादार होते, त्यात समीर आणि अमित यांचाही सामावेश होता. या निकालामुळे दोघेही खट्टू झाले खरे, पण समलिंगी विवाह कायद्याने संमत नसतील तरी समलिंगी संबंधांना संरक्षण आहे आणि एलजीबीटीक्यू समुदायातील एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या कोणीही व्यक्ती या नात्याचे सेलिबेशन करू शकतात, असा विचार त्यांनी केला. आणि हाच या सोहळ्यामागचा मुख्य हेतू होता.

समारंभाला दोघांचे जवळचे नातेवाईक मित्र आणि पुण्यातील एलजीबीटीक्यू समुदायातील काही कार्यकर्ते असे ९५ जण उपस्थित होते. समीर आणि अमित यांच्या आईने त्यांना औक्षण केले. नंतर २० वर्षांच्या प्रदीर्घ नात्याबद्दल आणि एकमेकांबद्दलच्या भावना दोघांनी व्यक्त केल्या. दोघांनी एकमेकांना सात वचने दिली. प्रत्येक वचनानंतर एक आकाशदिवा प्रज्ज्वलित करून आकाशात सोडण्यात आला. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या, एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. मेजवानीत आवर्जून ठेवलेल्या मराठी पदार्थांवर उपस्थितांनी ताव मारला.

दोघांच्या नातेवाइकांनी समीर आणि अमितविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक निमंत्रित आपल्या छोट्या मुलांना घेऊन आले होते. कोणत्याही कौटुंबिक सोहळ्यात असावे तसे घरगुती वातावरण होते. लोक सहजतेने वावरत होते. २० वर्षांत त्यांच्या नात्यासोबत समाज बदलला, अधिक प्रगल्भ झाल्याचं दिसल्याने समाधान वाटल्याचे समीर म्हणाला. कोणत्याही बंदिस्त हॉलमध्ये कार्यक्रम न घेता खुल्या मैदानावर तो घेतला कारण एलजीबीटीक्यू नात्याला समाजाने खुलेपणाने स्वीकारावे, अशी भूमिका होती, असे तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *