लक्ष्मीपूजनाचा रविवार मुंबईकरांसाठी तापदायक; मध्यरेल्वेवर भरदिवसा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहा

12 सप्टेंबर 2023 रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रवास खडतर होणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं दिवाळीत नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. (Mumbai Local Train Update)

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान रविवारी दिवसा मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं मुख्य मार्गावरील धीम्या आणि हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वेनेही शनिवारी मध्यरात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं रविवारी कोणताही ब्लॉक नाहीये. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलं आहे. रविवार असल्याने अनेकजण नातेवाईंकाकडे भेटीगाठी घेण्यासाठी जातात. मात्र, दिवाळी असूनही मध्य रेल्वेने याच दिवशी मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *