वडिलांची गाडी घेऊन बाहेर पडलेल्या 14 वर्षाच्या मुलाने वृद्धाला चिरडलं

 मुंबई 14 वर्षाच्या मुलाने एका वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चांदिवली (Chandivali) परिसारत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. मुंबईतील चांदिवली परिसरात एका 14 वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांची गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नववीच्या विद्यार्थ्याने वृद्धाला धडक दिल्याने  व्यावसायिक कायदेशीर सल्लागार असलेल्या वृद्धाचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्धाला मुलाने दोनदा चिरडलं होतं. पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी दंड ठोठावला असून मुलावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

6 सप्टेंबर रोजी झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज गेल्या आठवड्यात समोर आले होते. गाडी इमारतीतून बाहेर पडताना मुलाचे नियंत्रण सुटले. गाडीने बाहेर येताच रिक्षाला धडक देऊन तिथून जात असलेल्या व्यक्तीला दोनदा चिरडले. या अपघातात सुभरामन कृष्णन (63) हे गंभीररित्या जखमी झाले.

चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशने एस्कवर (पूर्वीचे ट्विटर) या अपघाताचे सीसीटीव्ही पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिस आणि मुंबई वाहतूक पोलिसांना टॅग करण्यात आले आहे. याप्रकरणी साकी नाका पोलिसांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *