महिला पोलीस शिपायाला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; पोलीस शिपायावर गुन्हा

शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पोलीस शिपायाला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलीस वसाहत) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिला पोलीस शिपायाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि मोघे यांची ओळख होती. टाळेबंदीत मोघे हा महिला पोलीस शिपायाच्या घरी जेवायला यायचा. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. तिच्यावर बलात्कार करुन ध्वनिचित्रफीत तयार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *