पवईत सापडला एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

रविवारी रात्री मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पवईमध्ये एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, फ्लॅटमध्ये तरुणीचा मृतदेह सापड्याने इमारतीमधील रहिवाशांना धक्का बसला आहे.

मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारवाह रोडवर असलेल्या एनजी हाऊसिंग सोसायटीमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.

मृत तरुणी एअर होस्टेस असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र ही मृत तरुणी कोण आहे, ती फ्लॅटमध्ये कधीपासून एकटीच राहत होती आणि तिच्या हत्येमागचे कारण काय याबाबत पोलीस प्रत्येकाकडे तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *