विश्रांतवाडी परिसरातील आठवीत शिकणार्या दोन अल्पवयीन मुली घरी न सांगता मुंबईला आल्या. बराचवेळ झाला तरी मुली घरी न परतल्यामुळं त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही लगेचच सूत्र हलवत दोघींना शोधून काढले आहे. मात्र, या मुलींनी घर का सोडले याचे कारण ऐकून पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे.
पालकांची तक्रार मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवली त्यानंतर रात्री दोन वाजता पालकांना मुंबईत मुली सुखरूप आढळून आल्या आहेत. विश्रांतवाडी परिसरात राहणार्या अल्पवयीन मुली राधा आणि गौरी (नावे बदलली आहेत) या शाळकरी मुलींनी घर सोडून दक्षिण कोरिया गाठण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रयत्नात त्या मुंबईला गेल्या होत्या.
