‘नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर’, वडिलांच्या अटीनंतर निधी ‘अशी’ बनली IAS अधिकारी

 यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. पण यातील मोजकेच उत्तीर्ण होतात. खडतर परिस्थितीवर मात करत ते यशाला गवसणी घालतात. हरियाणा निधी सिवाच देखील त्यापैकी एक आहे. एकीकडे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत असताना तिला यूपीएससी उत्तीर्ण करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

मुली वयात आल्या की लग्न करायचे असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे लग्नाआधी मुलींना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळतो. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणाऱ्या निधी सिवाचला इंजिनीअरिंग करायचं होतं. बारावी उत्तीर्ण झाल्यावर तिने मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घेतला होता. यानंतर निधी सिवाचने हैदराबादमधील एका कंपनीत दोन वर्षे कामदेखील केले. पण तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं लिहिलं होतं.

 इंजिनीअरिंग करत असताना या क्षेत्रात मन रमत नसल्याचे तिला जाणवले. आपण यापेक्षा काहीतरी चांगलं करू शकतो असे तिला वारंवार वाटायचे. अखेर ती एका महत्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचली. तिने नागरी सेवा परीक्षेपासून प्रेरित झआली होती. त्यामुळे आपण यूपीएससी परीक्षा देऊन नागरी सेवेत सहभागी व्हायचे असा निर्णय तिने घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *