सुझानच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेवर आई झरीन खान म्हणाली….

सुझानच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेवर आई झरीन खान म्हणाली….

हृतिक रोशनशी काडीमोड घेतल्यानंतर सुझान खान त्याच्याच जवळच्या मित्रासोबत लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा होती. मात्र सुझानची आई झरिन खान यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे.

मीडियामध्ये अशा बातम्या कोण आणि का पसरवतं, असा सवाल करत झरीन खान यांनी याबद्दल राग आणि नाराजी व्यक्त केली आहे. माझी मुलगी हृतिकच्या कोणत्याही मित्रासोबत विवाह करत नसून सध्या तरी तिचा पुन्हा लग्नाचा विचार नसल्याचं झरीन यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 2013 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. अखेर मुंबईतील बांद्रा कोर्टाने नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *