विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या खोलीत घुसून महिलेवर हात टाकला अन् नंतर….; मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईत सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबईतील एका वसतीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या एका वसतीगृहात एका विद्यार्थ्याने जेवण बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी  याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी मुलींच्या वसतीगृहात एका सुरक्षा रक्षकाने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.

मुलांच्या शासकीय वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करुन एक 26 वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थी फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपी अविनाश बनसोडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पदव्युत्तर असलेल्या अविनाश बनसोडेवर एका सरकारी मुलांच्या वसतिगृहात महिला स्वयंपाकीसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. अविनाश बनसोडे नावाचा आरोपी सध्या फरार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश बनसोडे हा त्या वसतिगृहात राहत नव्हता. 14 ऑगस्ट रोजी तो वसतिगृहात राहणाऱ्या मित्रांना भेटायला गेला होता आणि त्याने रात्री तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आरोपीने महिलेसोबत छेडछाड केली आणि पळ काढला. 25 वर्षीय पीडित महिला वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीत सासू आणि तिच्या दोन मुलांसह राहते. महिलेचा पती आणि इतर नातेवाईक जवळच राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश बनसोडे हा त्या वसतिगृहात राहत नव्हता. 14 ऑगस्ट रोजी तो वसतिगृहात राहणाऱ्या मित्रांना भेटायला गेला होता आणि त्याने रात्री तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आरोपीने महिलेसोबत छेडछाड केली आणि पळ काढला. 25 वर्षीय पीडित महिला वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीत सासू आणि तिच्या दोन मुलांसह राहते. महिलेचा पती आणि इतर नातेवाईक जवळच राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *