टाटा डीइएफ कंपनीच्या नावाने बनावट उत्पादन (रसायन) तयार करून बनावट व्यापारी चिन्हाचा वापर केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध साक्री पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सागर आबनावे (रा. सहकार नगर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रूपेश गवळी (दहिवेल, साक्री) आणि अनिल खलाणे (रा. शिरपूर) या दोघांनी महेंद्र गवळी (रा. दहिवेल) यांच्या शेतातील कुक्कुटपालनाच्या रिकाम्या शेडमध्ये टाटा डीइएफ या कंपनीच्या नावाने बनावट उत्पादन (रसायन) तयार करून बनावट व्यापारी चिन्हाचा वापर केला.
या तयार करण्यात आलेल्या उत्पादनाची बेकायदेशीर विक्री करून कंपनीच्या स्वामित्व हक्काचा भंग केला. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
