देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई, ठाणे या महानगरांलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळतोय. जगाने विज्ञानाची कास धरली असताना दुसरीकडे पालघरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क अघोरी उपचार करण्यात आले. हे उपचार कोणत्या बाबा-बुवाच्या आश्रमात नव्हे तर रुग्णालयात करण्यात आले, हे खूपच भयावह होते.
पालघर रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर समोर आला आहे.
