राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरु झालं आहे. अधिवेशनात आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासोबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमुळे देखील अधिवेशनात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
