दहा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या सावत्र पित्याला अटक

दहा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पित्याला शाहू नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १८ जुलै रोजी घडला होता. तक्रारदार महिला कामावर गेली असता पीडित मुलगी घरात एकटी होती.

आरोपीने पीडित मुलगी एकटा असल्याचा फायदा उचलून तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यामुळे घाबरलेली मुलगी रडू लागली. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने याप्रकरणी शाहू नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या  ४० वर्षीय सावत्र पित्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत शनिवारी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *