दादर येथे १६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ५४ वर्षीय आरोपीला दादर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीविरोधात अनैसर्गिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मारहाण करून धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दादर पश्चिम येथे मंगळवारी हा प्रकार घडला.
पीडित मुलगा गरीब घरातील असून मजूरी करतो. तो झोपला असताना आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. विरोध केला असता आरोपीने त्याला मारहाण केली. याप्रकरणी आगर बाजार परिसरात राहणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीला दादर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात अनैसर्गिक अत्याचार, बालकांचे लैंगिक अपराधांपासून सरंक्षण कायदा, धमकावणे, मारहाण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने तक्रार केल्यानंतर परिसरात शोध घेऊन आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
