बॉडीबिल्डिंग विश्वातील अत्यंत मोठं नाव आणि महाराष्ट्र श्रीपासून मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स अशा अनेक स्पर्धेंवर नाव कोरणाऱ्या आशिष साखरकर यांचं निधन झालं आहे. आजारापणाशी झुंज आशिष यांची अपयशी ठरली. आशिष यांची देश विदेशात ख्याती होती. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून भारताचं नाव जगभरात प्रसिद्ध केले होते. मुंबईकर आशिषच्या असा जाण्यामुळे क्रिडा विश्वास शोककळा पसरली आहे.
आशिष यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आशिष हे प्रत्येक बॉडीबिल्डिंग करणाऱ्या तरुणांसाठी आयकॉन होते.
आशिष यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांच्या असंख्य चाहते आणि मित्रांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
आशिष साखरकर यांनी पटकावलेले पदकं
मिस्टर इंडिया विजेते – चार वेळा
फेडरेशन कप विजेता – चार वेळा
मिस्टर युनिव्हर्स – रौप्य आणि कांस्य पदक
मिस्टर आशिया – रौप्य
युरोपियन चॅम्पियनशिप
