“तू माझ्या मित्राबरोबर…”; पतीच्या मागणीनंतर महिलेच्या पायाखालची वाळू सरकली

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने पती, पतीचा मित्र आणि त्याच्या पत्नीवर पत्नींच्या आदलाबदलीचा ( वाईफ स्वॅपिंग ) गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने ९ जून २०२३ ला पतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पीडित महिला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवाशी आहे. या महिलेचे लग्न मुरादाबाद येथील तरुणाबरोबर झालं होतं. त्यानंतर महिला पतीसह नोएडा सेक्टर-१३७ येथील एका सोसायटीत राहत होती.

महिलेने तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, मागील वर्षी १८ एप्रिलला पतीसह एका पार्टीला गेली होती. जिथे पतीचा मित्र आपल्या पत्नीसह आला होता. पार्टीत पतीने जबरदस्तीने मद्य पाजले. त्यानंतर पतीने मित्राबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितलं. तसेच, तिचा पती मित्राच्या पत्नीबरोबर लैंगिक संबंध ठेवणार होता. याला पत्नींची अदलाबदली बोललं जातं. महिलेने याला नकार दिल्यावर पतीने तिला सोडण्याची धमकी दिली.

यानंतर महिलेने पती, पतीचा मित्र, त्याची पत्नी, सासू, सासरे आणि नणंदेसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *