ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात

ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात

अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून भाजपाचे साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. या सगळ्यात आता उद्धव ठाकरे गट पुन्हा सक्रिय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निलंबनाबाबत ठाकरे गटात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यास इतर शिवसेना आमदारांच्या निलंबनाबाबत यापूर्वीच कोर्टात मोठ्या प्रमाणात याचिका दाखल  आहेत या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी आता प्रभू यांनी कोर्टात केली आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्षांना या निलंबनाबाबत निर्देश देण्यात यावेत अशी मागणी ही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांच्या  याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शरद पवार ठाकरेंसोबत..

दरम्यान  गेल्या वर्षी ज्याप्रमाणे शिवसेना फोडण्यात आली होती अगदी त्याच पद्धतीने राष्ट्रवादीलाही यावर्षी खिंडार पडले. यानंतर शरद पवार यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं म्हटलं होतं. संजय राऊत यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरेंचा आपण पुन्हा सर्व नव्याने उभे करू असे पवार यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *