ठाकुर्लीत मांजराला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन फेकल्याने मृत्यू

ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरील एका इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या रहिवाशाने मांजराला मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता खिडकीतून बाहेर फेकले. जमिनीवर पडून गंभीर दुखापत झाल्याने मांजराचा (बोका) जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने प्राणीमित्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 ९० फुटी रस्त्यावरील डीएनएस बँकेजवळील सर्वोदय मंगल सोसायटीच्या इमारत क्रमांक दोनजवळ हा प्रकार घडला आहे. हा प्रकार सोसायटीमधील नक्की कोणत्या सदस्याने केला आहे याविषयी सोसायटीतील इतर सदस्य उघडपणे बोलत नाहीत.

मांजराला वरुन फेकून त्याच्या मरणाला कारणीभूत ठरल्याने डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्त्या रेखा रेडकर यांनी अज्ञात व्यक्ति विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायद्याने सर्वोदय मंगल सोसायटीतील इमारत दोन मधील अज्ञात रहिवाशाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. बाकले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *