जूनमध्ये मुंबईतील ९६९५ घरांची विक्री

मुंबईतील ९,६९५ घरांची जून महिन्यात विक्री झाली असून राज्य सरकारला यातून ७९४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यापूर्वीच्या महिन्यात ९,८२३ घरांची विक्री झाली होती आणि यातून ८३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

मे आणि जून महिन्यांतील घर विक्री १० हजारांचा टप्पा पार करू शकली नाही. मार्च आणि एप्रिल महिना वगळता इतर महिन्यांत घर विक्रीने १० हजारांचा पल्ला पार केलेला नाही. मार्चमध्ये १३ हजार १५१ घरविक्री झाली होती आणि यातून १२२५ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. तर एप्रिलमध्ये १० हजार ५१४ घरांची विक्री झाली होती. तर या घरांच्या विक्रीतून ८९९ कोटी रुपये महसूल मिळाला होता.जानेवारी, फेब्रुवारी, मे आणि आता जूनमध्ये विक्री झालेल्या घरांची संख्या १० हजारांच्या आतच आहे. जानेवारीत ९ हजार घरे विकली गेली होती आणि यातून ६९२ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. तर फेब्रुवारीत ९ हजार ६८४ घरांच्या विक्रीतून १,१११ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मेनंतर आता जूनमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत ९६९१ घरांची विक्री झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *