४० वर्षांनी झेवियर्स कॉलेजमध्ये मराठीचं पुनरागमन; पहिल्याच वर्षी १२० विद्यार्थ्यांनी निवडली मराठी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (NEP) प्रादेशिक भाषांवर भर दिल्याने तब्बल चार दशकांनंतर मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पुन्हा मराठी भाषेचं शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. सेंट झेवियर्स कॉलेजला १९८५ साली मराठी विभाग बंद करावा लागला होता. कारण मराठी विषय मोजक्याच विद्यार्थ्यांनी निवडला होता. तसेच मराठी विभाग सांभाळणारे प्राध्यापकही निवृत्त झाले होते. त्यामुळे १९८५ साली मराठी विभाग बंद केल्यानंतर पुढच्या काळात बीए (मराठी) हा पदवी अभ्यासक्रमही बंद करण्यात आला होता.

पण राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये मराठीचं पुनरागमन होत आहे. महाविद्यालयाने या वर्षापासून पदवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल लँग्वेज म्हणून ‘संभाषणात्मक मराठी’  हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० टक्के विद्यार्थ्यांनी मराठी भाषा निवडली आहे.आता सेंट झेवियर्स महाविद्यालयात राष्ट्रीय धोरणांतर्गत विहित केलेल्या ‘Ability Enhancement Course’ (AEC) म्हणून मराठी भाषा शिकवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना निवडीचा पर्याय दिला जाईल. १९ जूनपासून सुरू झालेल्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत १२० विद्यार्थ्यांनी मराठी भाषा निवडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *