अंधेरी-विलेपार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, जलद मार्गाची वाहतूक धिम्या गतीच्या ट्रॅकवर वळवण्यात आली आहे, मात्र सायंकाळपर्यंत हे काम चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
वाढलेल्या तापमानामुळे ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे प्रशासनानं व्यक्त केला आहे, ट्रेन पुन्हा रूळावर सुरळीत आणण्यासाठी वेळ लागणार आहे, रात्री उशीरापर्यंत पश्चिम रेल्वेचं काम चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अंधेरी-विलेपार्ले दरम्यान पश्चिम रेल्वेच्या लोकलचे ४ ते ५ डबे घसरले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमधील गर्दीच्या वेळेत ही घटना घडलीय.
ही लोकल विरारहून चर्चगेटकडे जात होती.ही घटना अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान घडली आहे. कुणीही जखमी झालं नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

