अंबरनाथ येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती. मात्र, हत्येची माहिती मिळत नव्हती. दरम्यान, या वृद्धाच्या हत्येचे कारण पुढे आले नव्हते. पोलिसांनी अधिक तपास करताच धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धाची हत्या एका तरुणाने केल्याचे तपासात उघड झाले. या वृद्धाने समलैंगिक संबंधांची मागणी करताना त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणाची सटकली आणि त्यांने वृद्धाचा गेम केला.
अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात वृद्धाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी संदीप जैस्वाल या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. समलैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याने कृष्णानंद मुनियान यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
