मल्याळी इंडस्ट्रीवर शोककळा, अभिनेते पूजापुरा रवी यांचं निधन; ८०० चित्रपटांत केलं होतं काम

 मल्याळी फिल्म इंडस्ट्रीतले ज्येष्ठ अभिनेते पूजापुरा रवी यांचं आज निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. अभिनेत्याच्या निधानाने चाहत्यांना धक्का बसला आहे. तर सिनेसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. अनेक कलाकरांनी पूजापुरा यांच्या निधनावर दु:ख झालं आहे. पूजापुरा यांच्या अंत्यसंस्काराबद्दल कोणतीही माहिती कुटुंबियांनी दिली नाही.

पूजापुरा रवी यांनी ८०० पेक्षा जास्त चित्रटात काम केलं होतं. ‘गप्पी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता टोविनो थॉमस हा मुख्य भूमिकेत होते.पूजापुरा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात दिवंगत एन.के. आचार्य यांच्या कलानिलयम या नाटक कंपनीतून केली होती.गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पूजापुरा हे तिरुवनंतपुरमहून इडुक्कीतल्या घरी स्थायिक झाले होते. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं.पूजापुरा यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेते कोचू प्रेमन यांनीही जगाचा निरोप घेतला. त्यांनी १९७९ साली मल्याळी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. ‘एढू निरंगल’ या सिनेमातून त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. मात्र ९० च्या दशकामध्ये त्यांना मल्याळी सिनेविश्वात विशेष ओळख मिळाली होती. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिले नाही. प्रेमन हे मल्याळम सिनेमातील विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी गेल्या दोन दशकांमध्ये मल्याळी सिनेमात विशेष काम केलं आहे. मालिकांमधीलही त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ते त्यांच्या तिरुअनंतपुरम उच्चारणासाठी प्रसिद्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *