हुक्का पार्लरवर समाजसेवा शाखेची कारवाई

अनधिकृतरित्या सुरू असलेल्या चेंबूरमधील एका हुक्का पार्लरवर गुरुवारी समाजसेवा शाखेने छापा घातला. यावेळी समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ४० जणांना ताब्यात घेतले असून त्यांना टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

घाटकोपर राजावाडी रुग्णालय परिसरात अनधिकृतरित्या ‘किक कॅफे’ हा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली. समाजसेवा शाखेने गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ‘किक कॅफे’वर छापा घातला. यावेळी येथे अनेक तरुण आणि तरुणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचे आढळून आले. समाजसेवा शाखेने हुक्का पार्लरमधील कर्मचाऱ्यांसह एकूण ४० जणांना ताब्यात घेतले. पोलिसानी या कॅफेतून तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत केले. याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *