भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पट्रोल ओतले आणि… मुंबईतील भयानक घटना

लिव्ह इन पार्टनरेन आपल्या प्रेयसीच्या हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करुन, कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खायला घातले. मीरारोड येथे घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईच्या कुर्ला परिसरात एक भयानक घटना घडली आहे.  भर रस्त्यात  महिलेच्या अंगावर पट्रोल टाकून तिला जिवंत पेटवण्यात आले. एका रिक्षा चालकाने दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.

काय घडलं नेमकं?

कुर्ला येथील  नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कुर्ला परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे ब्रिज खाली या महिलेला जिवंत पेटवण्यात आले. सरिता ठाकूर ( वय 32 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. सरिता नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जाण्यासाठी अण्णाभाऊ साठे ब्रिज खाली बसची वाट पाहत उभी होती. यावेळी एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. यानंतर लाईटरच्या सहाय्याने तिला पेटवलं आणि तिथून पळ काढला.

असे वाचले महिलेचे प्राण

अंगावर पेट्रोल ओतून पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने सरिता रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना मदतीसाठी बोलवत होती. परंतु कोणीच तिच्या मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही .अखेर त्याच परिसरातून जात असलेल्या मोहम्मद इस्माईल शेख या रिक्षा चालकाने सरिता हिला जळताना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपल्या रिक्षात असलेली पाण्याची बाटली घेऊन त्याने तिच्या शरीरावरील आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर तातडीने तिला त्याने तिला सायन रुग्णालयात दाखल केले. सरिता ही दहा टक्के भाजली आहे.  जर वेळीच मोहम्मद इस्माईल शेख याने तिला वाचविले नसते तर तिचा यामध्ये जीवही गेला असता.

पेट घेतलेल्या एका महिलेला ती कुठल्या जातीची किंवा धर्माची आहे. याचा विचार न करता तिचा बचाव करत तिला थेट रुग्णालयात दाखल केलं त्याच्या या प्रसंगावधानामुळे ही महिला थोडक्यात बचावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या ब्रिज खालून अनेक वाहन ही येजा करत होती परंतु जळालेल्या या महिलेला वाचविण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हतं. परंतु रिक्षाचालक असलेल्या मोहम्मद इस्माईल शेख याने रिताला ला जळताना पाहून तिला वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे सरसावला.

महिलेला जिवंत पेटवणारा व्यक्त कोण?

भर रस्त्यात रिताच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून तिचा पती आहे. संजय राठोड असे त्याचे नाव आहे.  घरगुती वादामुळे गेल्या काही दिवसांपासून सरिता तिच्या पतीसोबत  राहत नव्हती.  चेंबूरच्या सुमन नगर भागात ती तिच्या माहेरी राहत होती.  त्यामुळे संजय राठोड याने तिला जिवानिशी मारण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु मोहम्मद इस्माईल शेख याच्या प्रसंगावधानामुळे सरिता यांच्या जीव वाचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *