गायक मिका सिंगला दिलासा; विनयभंगाचा गुन्हा रद्द

वाढदिवसाच्या मेजवाणीमध्ये गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंत हिच्या तक्रारीवरून गायक मिका सिंग याच्याविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. मिकाविरोधात दाखल गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्यास आपली हरकत नसल्याचे राखी हिने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने मिकाविरोधात १७ वर्षांपूर्वी नोंदवलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द केला. राखी हिने केलेल्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी २००६ मध्ये मिकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मिका याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या घटनेला खूप काळ लोटला असून राखी आणि आपल्यात आता मैत्रीचे संबंध आहेत, असे मिका याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *