चंद्रपुरात थरारक घटना! १४ वर्षांची तरुणी एकटी असताना घरात घुसला, तिच्यावर पेट्रोल टाकले अन्…

एकतर्फी प्रेमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तरुणीने नकार दिल्याचा राग मनात ठेवून चंद्रपुरात एका तरुणाने धक्कादायक प्रकार केला आहे. १९ वर्षांच्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तरुणीच्या पालकांनी तरुणाविरोधात तक्रार दाखल केला आहे.

तरुणी एकटी असताना घरात घुसला

प्रेमाला नकार दिल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १९ वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने प्रतिकार करत आरडा-ओरडा केल्याने आरोपीने तिथून पळ काढला. भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथील सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्या घरात प्रवेश करून हे धक्कादायक कृत्य केलं आहे.

नकार देताच पेट्रोल टाकले

सोमवारी पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्याचवेळी  आरोपी घरात आला. त्याने तिला प्रपोज केले. मात्र तिने नकार देताच त्याचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने सोबत आणलेले पेट्रोल तिच्यावर टाकले. मात्र तरुणीने प्रसंगावधान राखत आरडा-ओरड केली तसंच त्याला प्रतिकार केला. शेजारचे जमा होतील आणि आपड पकडले जाऊ या भीतीने त्याने तरुणीच्या घरातून पळ काढला.

तरुणाविरोधात गुन्हा दाखल

मुलीचे आई-वडिल घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठून तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सिद्धांत भेले या या तरुणावर मंगळवारी रात्री जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा ३०७ गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आरोपी तरुणी आयटीआयचा विद्यार्थी

आरोपी तरुण हा देखील बेलगावचाच रहिवासी आहे. तसंच, तो आयटीआयचा विद्यार्थी असून चंद्रपूर शिक्षण घेत आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

दहावीची मार्कशीट आणायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार

दहावीच्या निकालाची प्रत आणण्यासाठी शाळेत गेलेल्या मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शाळेतून परतत असताना दोन नराधमांनी तिला बळजबरी दारू पाजली त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पहाटे तिला चौकात सोडून तिथून फरार झाले. तरुणीने पालकांना तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *