सासुने सुनेच्या बांगड्या फोडल्या, नंतर तोंडात कोंबून डोकं भिंतीवर आपटलं

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक गोष्टी घडत आहेत. चर्चगेट येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीची हत्याप्रकरण  तर मिरारोडमध्ये महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याचे प्रकरण असो या दोन घटनांनी देश हादरला आहे. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्क्दायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींनी विवाहित महिलेच्या बांगड्या फोडून जबदरस्ती तिच्या तोंडात भरवण्यात आल्या आहेत. त्यानंतर तिला अमानुष मारहाण करण्यात आली. पीडितेच्या वडिलांनी आणि भावाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षांच्या पीडितेचा निकाह दोनगाव येथे राहणाऱ्या फिरोज खानसोबत झाला होता. पती फिरोज खान आणि त्याची आई सातत्याने पीडित महिलेला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करत होते. मात्र, महिलेने माहेरुन पैसे आणण्यास नकार दिला. याआधीही तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या सासरी पैसे दिले होते. त्यामुळं आता पुन्हा त्यांना पैसे देणे शक्य होणार नाही, असं तिने तिच्या पतीला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *