विठूमाऊलीच्या दर्शनाची ओढ… पंढरपूरसाठी अमरावतीतून १०० जादा बसेस

‎भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त ‎विठूमाऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली असताना एसटी महामंडळाच्या अमरावती ‎विभागाने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सातही ‎स्थानकांवरून जादा बसगाड्यांची सोय केली ‎असून, यंदा एकूण १०० बसगाड्या भाविकांना घेऊन ‎पंढरपूरकडे धावणार आहेत.

२५ ते ४ जून या ‎ कालावधीत पंढरपूरसाठी ही व्‍यवस्‍था करण्यात ‎आली आहे. ‎ प्रवाशांसाठी जाणे-येणे करण्यासाठी ‎आरक्षणाची सोय आहे. तसेच ग्रामीण ‎भागांतील प्रवाशांना ग्रुप बुकिंगही करता येणार ‎ आहे. परतीच्या वेळी ६० बसची सोय ‎द्वादशीला तसेच ४० एसटीची सोय पौर्णिमेला ‎करण्यात आली आहे. ‎यंदा चालक-वाहकांची नावे आणि मोबाईल ‎क्रमांक ठळकपणे प्रसिद्ध केले जाणार आहेत. ‎त्याचा फायदा भाविकांना होणार असून त्यांचा ‎परतीचा प्रवास सुलभ होणार आहे.

अमरावती विभागाकडे एसटी बसेसची ‎संख्या मर्यादित असल्यामुळे भंडारा येथील ‎डेपोतून अतिरिक्त २५ बसेस मागवण्यात आल्या ‎आहेत. ‎मागच्या वर्षी अमरावती-पंढरपूर अशा ८२ ‎बसेसने ८८ फेऱ्या केल्या होत्या. यंदा विभागातील अमरावती येथून १६, बडनेरातून ‎(अमरावती) १४, दर्यापुरातून १३, ‎ परतवाडातून १२, वरुड येथून ११, चांदूर रेल्वे ‎ येथून १०, मोर्शीतून १२ व चांदूर बाजार १२ ‎ बसेस अशा सातही स्थानकांवरून एकूण १०० ‎एसटी बस भाविकांना घेऊन पंढरपूरकडे ‎ निघणार आहेत. ‎

८२० रुपये तिकीट दर

अमरावती-पंढरपूर वाशीम, परभणी मार्गे जाणाऱ्या‎ एसटीचे तिकीट ८२० रु. आहे. त्याचप्रमाणे‎ दर्यापूर-पंढरपूर, मूर्तिजापूर, परभणी मार्गे जाणाऱ्या‎ एसटीच्या तिकीटाची किंमत ८०० रु.‎, परतवाडा-पंढरपूर, अमरावती, परभणी मार्गे‎ जाणाऱ्या एसटीचे तिकीट ८९५ रु., वरुड-पंढरपूर,‎ अमरावती, परभणी मार्गे जाणाऱ्या बसचे तिकीट‎ ९५० रु., चांदूर रेल्वे-पंढरपूर, अमरावती, परभणी‎ मार्गे जाणाऱ्या बसचे तिकीट ८६० रु.,‎ मोर्शी-पंढरपूर, अमरावती, परभणी मार्गे जाणाऱ्या‎ एसटीचे तिकीट ८९५ आणि चांदूर बाजार-पंढरपूर,‎ अमरावती, परभणीमार्गे जाणाऱ्या बसचे तिकीट ८८० रु. आहे. प्रवासाचे एकूण टप्पे व अंतरानुसार‎ तिकीटांचे दर कमी जास्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *