राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक;

मनसे नेते अविनाश जाधव यांनी औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक कापल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे   यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.  वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ येथे शर्मिला ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त अविनाश जाधवांनी औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक आणला होता. मात्र, शर्मिला ठाकरे हा केक कापताना दिसत नाहीत. अविनाश जाधव केक कापताना व्हिडीओ दिसत आहेत.

मुंबईत मनसेचे आंदोलन

अहमदनगरच्या भिंगारमध्ये काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो नाचवल्यानं वाद झाला होता. आता कोल्हापुरातही असाच प्रकार घडला होता. याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. बुधवारी  मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचा पुतळा जाळला. यावेळी औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंग्याचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नसल्याचा  इशारा मनसेकडून देण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *