हार्बर रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायर तुटली, शॉर्टसर्किटमुळे आग; पाऊण तासापासून वाहतूक ठप्प

हार्बर रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रॅकवरील ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती आहे. पीक अवरमध्ये झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही वाहतूक कधीपर्यंत पूर्ववत होणार, याविषयी रेल्वेकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉर्ट सर्किट सारखा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही वेळासाठी मोठी आग लागली. परिणामी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हार्बर रेल्वेच्या सर्व गाड्या नेरूळ मध्येच ठप्प आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, ओव्हरहेड वायर तुटली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. सीएसटी लेनची वायर तुटली आहे की खारकोपर लेनची ते अजून कळलं नाहीय, जर सीएसटी लेनची वायर तुटली असेल तर काही तास गाड्या फक्त सीएसटी वाशी याच दरम्यान धावतील आणि खारकोपरची वायर तुटली असेल तर ती लाईन बंद राहील .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *