मागील काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाचा वेग काहीसा मंदावला आहे. पण आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली आहे. बंगालच्या उपसागरात एक नवीन हवामान प्रणाली तयार होत आहे. यामुळे मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. महाराष्ट्रात देखील पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. 23 ऑगस्ट 2026 रोजी हवान कसे असले.
येत्या काही दिवसता देशभरात अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होऊ शकतो. येत्या काही दिवसांत, विशेषतः ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) याबाबत अंदजा वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. ही प्रणाली पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ तयार होण्याची शक्यता आहे. एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यावर, त्यामुळे आसपासच्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. हवामान विभाग हवामान प्रणालीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे.
बंगालच्या उपसागरात नव्याने तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम पुढील दोन ते तीन दिवसांत अधिक तीव्रतेने जाणवू शकतात. त्यामुळे, ज्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, तेथील लोकांनी स्थानिक हवामानाच्या माहितीवर लक्ष ठेवावे.
ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
नवीन हवामान प्रणालीचा सर्वाधिक परिणाम ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या राज्यांमधील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पूर येण्याची आणि स्थानिक पातळीवर व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, लोकांनी हवामानाच्या बदल्यांकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली ही प्रणाली केवळ किनारपट्टीच्या भागांपुरती मर्यादित राहण्याची शक्यता नाही. तिच्या प्रभावामुळे मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह 22 राज्यांना IMD चा अलर्ट
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, सिक्कीम, मिझोराम, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कसे असेल हवामान?
मुंबई आणि किनारपट्टीच्या प्रदेशात सर्वसामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि किनारपट्टीच्या प्रदेशात हलका पाऊस किंवा तुरळक सरींची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता असून, पुणे आणि सातारा घाट परिसरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
