बॉलीवूड गाण्यावर डान्स केला म्हणून एका सरकारी शाळेतील 7 शिक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. त्रिपुराच्या आगरतळामधील खुदीराम बोस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.
शाळेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाच्या रंगीत तालमीत शाळेतल्या एका महिला शिक्षिकेनी हिंदी गाण्यावर ताल धरला. त्यांच्या गाण्याला इतर शिक्षकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. या महिला शिक्षिकेचा हा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. इतकंच नाही तर स्थानिक केबलवर त्याचं प्रक्षेपणही झालं.
त्रिपुरा राज्याचे शिक्षणमंत्री तपन चक्रवर्ती विभागाने संस्थाप्रमुख पी के गोयल यांना प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्यानंतर तातडीनं कारवाई करत या शाळेतील 7 शिक्षकांची तातडीने बदली केली.
कारवाईआधी शिक्षण विभागाने शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र संबंधित शिक्षकांनी नियमांचा भंग केल्याचं सांगत त्यांची दूर बदली करण्यात आली.
