बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी चोरी झाली होती. अर्पिताच्या घरून चोरानं 5 लाख रुपयांची डायमंडचे कानातले चोरी केली होती. पण आता चोरालं पकडलं आहे. हा चोर तिच्या घरात कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा चोर तिच्या घरातील नोकर होतो. खरंतर अर्पिताच्या घरी ही चोरी 16 मे रोजी झाली आणि पोलिसांनी त्याच रात्री त्यांच्या नोकराला अटक केली. पण हे कळलं कसं तर अर्पितानं तिच्या कानातले चोरी झाल्यानंतर खान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
अर्पितानं पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले की तिनं तिचे डायमंड इअररिंग्स मेकअप ट्रेमध्ये ठेवले होते आणि तिथूनच ते गायब झाले. तिच्या या कानातल्यांची किंमत ही पाच लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी संदीप हेगडे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. संदीप हेगडे कोण आहे? संदीप हेगडे हा अर्पिताच्या घरी हाऊस कीपिंगचं काम करायचा. त्याला अर्पिताच्या घरी कामाला येऊन फक्त चार महिने झाले होते. संदीप हा विले पार्ले पूर्व येथे असलेल्या आंबेवाडी या झोपडपट्टीत राहणारा होता. तर संदीप अर्पिताच्या घरी 11 लोकांसोबत काम करत होता. तर चोरी केल्यानंतर संदीप डायमंड इअररिंग घेऊन कोणाला काहीही न सांगताना तिथून पळून गेला.
दरम्यान, सलमान आणि त्याची बहीम अर्पिता हे दोघं खूप जवळचे आहेत. ते दोघं नेहमीच एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. तर इतकंच नाही तर अर्पितानं तिच्या मुलीला जन्म हा देखील सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी दिला. अर्पितानं डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या जागी सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुलीला जन्म देण्याचं ठरवल्यानं तिनं वेळेच्या आधीच शस्त्रक्रिया करत मुलीला जन्म दिला.
