चिमुकल्याने इंग्रजीतील वारांची स्पेलिंग चुकवली, शिक्षिकेने पाठीवर वळ उठेपर्यंत बेदम मारलं

इंग्रजी वारांची स्पेलिंग येत नसल्याने शिकवणीच्या शिक्षिकेने सहा वर्षीय मुलाला जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना मिरा-भाईंदरमध्ये घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या आजीच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिस ठाण्यात या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदरच्या गणेश देवल नगर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारा सहा वर्षे चिमुकला एका खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला इंग्रजी लिहिता वाचता येत नसल्याने घरच्यांनी शाळेला सुट्टी असली तरी त्याला प्रतिमा प्रजापती यांची शिकवणी लावली होती. यावेळी त्याला इंग्रजी वारांची स्पेलिंग येत नसल्याने या शिक्षिकेने त्याला मारहाण केली. हा मुलगा घरी रडत गेल्यानंतर आजीने विचारणा केली असता त्याने हा प्रकार सांगितला. त्याच्या पाठीवर वळ उठल्याचे आजीच्या निदर्शनास आल्याने त्यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात या शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार भाईंदर पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *