या प्रकरणी अल्पवयीन मुलीने मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिजीत दिलीप पापळ (वय २१, रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) या नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर कलम ३७६ (२), (के) (एन), ३५४ (ड) आणि बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार – आठ आणि १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही मार्केटयार्ड परिसरात राहते. ती एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेते. कॉलेजला जाण्यासाठी ती रोज बसने जायची. बस थांब्यावरच पीडितेची आणि अभिजीतची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत नराधम अभिजीत पापळने अल्पवयीन तरुणीला जीवे मारण्याची धमकी आणि कॉलेज बंद करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे.
