पुण्यातील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये. खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यात सातत्याने वाढच होताना दिसत आहे. अशीच एक संतापजनक आणि धक्कादायक घटना मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीला कॉलेज बंद करण्याची आणि मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका २१ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
