‘तू मला आवडत नाहीस, घरी निघून जा, मला दुसरे लग्न करायचे आहे’ अशा शब्दात पतीने पत्नीला संसारातून दूर होण्याचा इशारा दिला. आयुष्याच्या जोडीदाराच्या तोंडून निघालेले हे शब्द विवाहितेच्या जिव्हारी लागले. दुखावलेल्या मनस्थितीतच तिने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. ही घटना संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या जांबरगाव येथे मंगळवारी रात्री घडली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकिता माळी (वय २१ वर्ष, राहणार जांबरगाव तालुका वैजापूर) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. निकिता हिचा काही वर्षांपूर्वी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील लखन याच्याशी विवाह झाला होता. नातेवाईकांच्या साक्षीने झालेल्या विवाह सोहळ्यानंतर आपलं आयुष्य सुखी समृद्धी होईल, अशी अपेक्षा निकिता हिला विवाहानंतर होती. मात्र पती लखनच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं.
