दिल्ली विद्यापीठात ‘आप’ चा सुपडासाफ

दिल्ली विद्यापीठात ‘आप’ चा सुपडासाफ

अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांच्या निकालात यंदाही भाजपची विद्यार्थी शाखा – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेच बाजी मारली आहे. विद्यापीठाच्या चारही जागांवर विद्यार्थी परिषदेचे उमेदवार निवडून आले आहेत.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव ही चारही पदं खिशात घालत अभाविपने NSUI आणि आप च्या उमेदवारांना जोरदार झटका दिला आहे. प्रत्येक जागा जवळपास साडेचार हजारांच्या मताधिक्याने जिंकत सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे.

दिल्ली विद्यापीठात यापूर्वीही अभाविपचीच सत्ता होती. मात्र केजरीवाल सरकार सत्तेत आल्यानंतर विद्यापीठांवर ‘आप’ विद्यार्थी संघटनेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती.

‘आम आदमी पक्षा’ने अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार प्रचारही केला होता. मात्र या सर्व शक्यतांवर मात करत पुन्हा एकदा एबीव्हीपीने आपला झेंडा फडकवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *