“उष्माघातामुळे बळी जाणं..” अप्पासाहेब धर्माधिकारी पुरस्कार सोहळ्यावरून राज ठाकरेंनी शिंदे सरकारला सुनावलं

निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. मी त्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं. मात्र या पुरस्कार सोहळ्यात आलेल्या लाखो लोकांपैकी ११ लोकांचा उष्माघाताने बळी गेला. ही घटना सरकारला टाळता आली नसती का? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत. काही वेळापूर्वीच ट्वीट करत राज ठाकरेंनी सरकारला हे सगळं सुनावलं आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?

 सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *