अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या (Maharashtra, Vidarbha) पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसानं मुंबईलाही चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली. वीजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्याच्या साथीनं अगदी मान्सूनच्या दिवसांत बरसतो तसा हा पाऊस बरसला. हा अनपेक्षित पण, सूचित हवामान बदल पाहून शहरातील नागरिकही हैराण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *