पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा मनस्ताप

पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्काळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली – दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडली. त्यामुळे अनेक गाड्यांना उशिर झाला. दरम्यान, ओव्हर हेड वायर तुटल्याने एससी लोकलचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ही  लोकल मध्येच बंद पडली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी पुढचे स्टेशन पायी जात गाठले.

मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. अर्धा तास लोकल सेवा ठप्प असल्याने कडक उन्हात प्रवाशांना रेल्वे रुळावरुन जावे लागले. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं विरारकडून चर्चगेटच्या दिशेने जाणारी एसी लोकल मध्येच बंद पडली. बोरिवली ते दहिसर स्टेशनदरम्यान एसी लोकल बंद पडल्याने कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अखेर प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरुन चालत पुढचं स्टेशन गाठले. मात्र यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालेला पाहायला मिळाला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *