पुढील सुचना मिळेपर्यंत McDonald’s बंद; अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागलेली असतानाच मोठमोठ्या कंपन्यांमधून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. असं असतानाच आता या यादीत दर दिवशी नव्यानं काही कंपन्यांच्या नावांचा समावेश होताना दिसत आहे. या कंपन्यांमध्ये जगातील सर्वात मोठी Fast Food Chain अशी ओळख असणाऱ्या Mcdonald’s चाही समावेश होणार आहे. कारण, या आठवड्यापासून Mcdonald’s त्यांची अमेरिकेतील कार्यालयं पुढील सुचना मिळेपर्यंत बंद करणार आहे.

कंपनीचं चाललंय काय? 

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या माहितीनुसार येत्या काळात कंपनीकडून कॉर्पोरेट विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जाऊ शकते, त्यांना यासंबंधीच्या सूचना देण्याच्या विचारात कंपनी असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सोमवार ते बुधवार यादरम्यान घरूनच काम करण्यासंबंधीचा Email करण्यात आला होत

2023 च्या सुरुवातीलाच दिली होती कर्मचारी कपातीची कल्पना… 

व्यवसायातील काही अद्ययावत आणि प्रगत तत्त्वांवर आधारित रणनितीची अंमलबजावणी करत असताना कंपनीकडून कॉर्पेरेट विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार असल्याचं म्हणत काही विभागांत कर्मचारी कपात केली जाऊ शकते, तर काही विभागांमध्ये नव्यानं नोकरभरती होऊ शकते याची कल्पना मॅकडॉनल्ड्सकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. सदरील घोषणा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील बुधवारपर्यंत होऊ शकते असं म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *