तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी पैसे हवे असतील आणि तुमच्याकडे पैसे नसतील. मात्र, तुमच्याकडे एटीएम असेल आणि एटीएम मशीनमधून तुम्हाला हवे असलेल्या रकमेपेक्षा कमी आणि त्यातही 10-10 च्या नोटा मिळाल्या तर?…राग अनावर होईल की नाही? मात्र, गोरखपूरमधील एका युनियन बँकेच्या एटीएममध्ये अस प्रत्यक्षात घडलं आहे.
जेव्हा दोघेजण पैसे काढण्यासाठी युनियन बँकेच्या एटीएममध्ये गेले, त्यावेळी 10-10 च्या नोटा निघाल्या. दोघांना 2 हजार रुपये काढायचे होते, मात्र प्रत्यक्षात केवळ 1020 रुपयेच निघाले. ज्यामध्ये 500 आणि 100 च्या नोटा आणि 10-10 च्या नोटा निघाल्या. त्यानंतर या दोघांनी युनियन बँकेच्या सुपरवाईजरशी संपर्क साधून नोटा परत केल्या आणि प्रकरण मिटवलं. एटीएममध्ये चुकन दहा रुपयांच्या नोटा टाकल्या गेल्याचं एटीएम ऑपरेशन सुपरवाईजरने सांगितले.
मात्र, या 10-10 च्या नोटा आल्या कुठून? एटीएममध्ये पैसे टाकताना कितीच्या नोटा आहेत, हे पाहिलं जात नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

