पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं असून या गारपिटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस
यासंदर्भात पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्यातील नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर मुंबई ठाणेसह काही भागात गेल्या २४ तासांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे, असे ते म्हणाले.
