RPF कार्यालयात जवानावर हल्ला करुन आरोपी पसार; डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना,

डोंबिवली रेल्वे स्थानकात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका मद्यपीला आरपीएफ जवानाने ताब्यात घेतले, मात्र या मद्यपीने आरपीएफ कार्यालयातच आरपीएफ जवानावर ब्लेडने हल्ला करून तो पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास डोंबिवली जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे.

मंगळवारी रात्री डोंबिवली रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवान फलाटावर ड्युटीवर असताना एक मद्यधुंद तरुण त्यांना दिसला. धुळवड असल्याने काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आरपीएफने त्याला पकडून आरपीएफ कार्यालयात नेले, मात्र त्याने आरपीएफ कार्यालयात धिंगाणा घातला. त्याला आवरत असताना दारूड्याने त्याच्या जवळ असलेल्या ब्लेडने आरपीएफ जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात आरपीएफ जवान नवरंग मिना जखमी झाले आहेत. हल्ला करून हा मद्यपी त्या ठिकाणाहून पसार झाला. जखमी आरपीएफ जवान मिना यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डोंबिवली जीआरपीकडून पसार दारूड्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *