ठाण्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ

ठाणे येथील कारागृहाजवळील तलावात सोमवारी सकाळी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला असून त्याची अद्याप ओळख पटली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

मध्यवर्ती कारागृहाजवळ तलाव आहे. सोमवारी सकाळी या तलावात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळाली. त्यानंतर पथकाने हा मृतदेह तलावाबाहेर काढला. अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटली नसल्याचे पथकाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *